वरणगाव फॅक्टरीजवळील घटना
भुसावळ (प्रतिनिधी ) ;- तलावात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १३ रोजी सकाळी वरणगाव फॅक्टरीतील शिव मंदिराजवळ उघडकीस आली. दीपक विलास तायडे (दर्यापूर शिवार) असे मयताचे नाव आहे. याबाबत वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वरणगाव फॅक्टरीला लागून असलेल्या सुशील नगर, दर्यापूर शिवारातील रहिवासी विलास तुकाराम तायडे यांचा मुलगा दीपक विलास तायडे हा युवक ११ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेला होता. वडील विलास तायडे यांनी वरणगाव पोलिसात हलविल्याची नोंद केली होती मात्र या तरुणाचा शोध सुरू असताना १३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दीपकचा आयुध निर्माणी वरणगाव वसाहतीत असलेल्या शिव मंदिराच्या काही अंतरावरील तलावात आढळला. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकु, आजी, आजोबा असा परिवार आहे.