जळगाव (प्रतिनिधी) : अंगणात खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलीला साप चावल्याची घटना चोपडा तालुक्यातील वडती येथे घडली असून तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले आहे. याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कविता सुनील बारेला (वय १०, रा. वडती, ता. चोपडा) असे मयत चिमुरडीचे नाव आहे. १० ऑगस्ट रोजी सकाळी तिला राहत्या घराच्या अंगणात खेळत असताना साप चावला. कुटुंबीयांना लक्षात येताच त्यांनी तिला उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन पाटील यांनी तपासून तिला मयत घोषित केले. अडावद पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहेत.