• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!

कोणत्याही क्षणी घोषणेची शक्यता

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 29, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!

​जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या माध्यमातून निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या जळगाव येथील जागेसाठी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. या हायव्होल्टेज निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर असून, त्यांनाच उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. पक्षाकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात असून कोणत्याही क्षणी याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

​उमेदवारीसाठी राजकीय वर्तुळात मोठी चुरस..
​विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासून जळगाव जिल्ह्यातून महायुती आणि विविध पक्षांकडून कुणाला संधी मिळणार, याबाबत कमालीची उत्सुकता आणि चुरस निर्माण झाली होती.

​शिवसेनेकडून (शिंदे गट) दावेदारी..
शिवसेनेच्या वतीने जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे नाव चर्चेत होते. यासोबतच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र नगरसेवक सुमीत पाटील यांच्याही नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.

​भाजपमधील इच्छुकांची भाऊगर्दी..
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेते उत्सुक होते. यात प्रामुख्याने उद्योजक नंदू अडवाणी, पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र फडके, पाचोरा येथील पदाधिकारी अमोल शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर आदींच्या नावांची चर्चा रंगली होती. तर भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे.

​डॉ. केतकीताई पाटील शर्यतीत पुढे; ‘हे’ ठरले जमेची बाजू..
​या सर्व दिग्गज नेत्यांच्या भाऊगर्दीत आणि राजकीय समीकरणांमध्ये माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनी आघाडी घेतली आहे. डॉ. उल्हासदादा पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता.

​भाजप प्रवेशानंतर डॉ. केतकी पाटील यांनी आपल्या सक्रिय राजकीय कारकिर्दीचा दमदार शुभारंभ केला. अत्यंत अल्प काळात त्यांनी जिल्हाभरात उत्तम जनसंपर्क निर्माण केला असून, सामाजिक आणि राजकीय कार्यात आपल्या कामाची वेगळी छाप उमटवली आहे. युवा नेतृत्व, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील पार्श्वभूमी आणि सर्वसमावेशक चेहरा यामुळे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून डॉ. केतकीताई यांच्या नावावर जवळपास निश्चिती झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

​आता भाजप हायकमांडकडून डॉ. केतकी पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

​

Tags: #political
Next Post
पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add