• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शासनाकडून महिलांचे सबलीकरण कार्य हा परमार्थ – पालकमंत्री

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 12, 2024
in जळगाव जिल्हा, मनोरंजन, राजकीय
0
शासनाकडून महिलांचे सबलीकरण कार्य हा परमार्थ – पालकमंत्री

जळगाव (प्रतिनिधी) : शासनाकडून महिलांच्या सबलीकरणासाठी ‘ मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ‘ असून बहिणींच्या हातात चार पैसे येतील त्या सक्षम होण्याचं हे पहिलं पाऊल असेल. महाराष्ट्र शासनाकडून हे मोठे कार्य होत आहे, हा एका अर्थानी परमार्थ आहे. अशा कार्याची सुरुवात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जळगाव मध्ये होत आहे. मंगळवारी दि. १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला अधिकाधिक बहिणींनी यावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘ मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण ‘ योजनेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्क जळगाव येथे मंगळवारी दि. १३ ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील आमदार, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, ‘ मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे तालुकानिहाय अध्यक्ष, सचिव यांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. या बैठकीला आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी, यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक तालुक्यातून या कार्यक्रमासाठी भगिनी येणार आहेत. त्यांची जबाबदारी त्या त्या तालुका समितीचे पदाधिकारी, अधिकारी यांची राहणार आहे. ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या पदाधिकारी यांना सन्मानाने सहभागी करून घेवून या कार्यक्रमाला अधिकाधिक, भगिनी यांच्यासह इतर नागरिक उपस्थित राहतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बहिणीला येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ‘ लाडक्या बहिणीला ही ओवाळणी आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला हा भावनिक पदर आहे. अशा कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. लताताई सोनवणे यांनीही काही महत्वाच्या सूचना यावेळी केल्या.


 

Tags: Jalgaon
Next Post
अंगणात खेळणाऱ्या १० वर्षीय चिमुरडीचा सर्प चावल्याने मृत्यू

अंगणात खेळणाऱ्या १० वर्षीय चिमुरडीचा सर्प चावल्याने मृत्यू

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add