जळगाव (प्रतिनिधी) : दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र तोडून दुचाकीने पसार झाल्याची घटना शहरातील गुड्डू राजा नगरातील निर्मला रेसीडन्सीजवळ घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उषा शशिकांत हिंगोणेकर (वय ५७ रा. निर्मला रेसीडन्सी, गुड्डू राजा नगर, जळगाव) या दि. ५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता घराच्या बाहेर शतपावली करत असतांना दुचाकीवर अज्ञात दोन जण आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत गळ्यातून खेचून दुचाकीने पसार झाले.
ही घटना घडल्यानंतर महिलेने आरडाओरड केली, परंतू तोपर्यंत चोरटे मुद्देमाल घेवून पसार झाले. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ योगेश पाटील हे करीत आहे.