चाळीसगाव | दि.०७ ऑगस्ट २०२४ | शहरातील एम. जे. नगर येथे जगेश्वर पापड केंद्र, पिठाची गिरणीतून ७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन आणि तीन हजार ३२० रुपये रोख असा दहा हजार ३२० रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरी केला होता. दरम्यान यासंदर्भात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला.
फिर्यादी विनोद प्रकाश बारी यांच्या फिर्यादीवरून निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांचे पथक स्थापन करुन त्यांना योग्य त्या सूचना देऊन रवाना केले होते. दरम्यान गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे चाळीसगाव शहरात बस स्थानकाच्या पाठीमागील परिसरात शोध घेतला असता संशयित मिळुन आला.
संशयित आरोपी आनंद राजेंद्र सरोदे (रा.गल्ली नं. ७, पारोळा रोड, धुळे) यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल आणि ३ हजार ३२० रुपये रोख असा १० हजार ३२० रुपये रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार), सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. राहुल सोनवणे, पो.ना. भूषण पाटील, महेंद्र पाटील, पो.कॉ. विजय पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, पवन पाटील, राकेश महाजन यांच्या पथकाने केली. पुढील तपास राहुल सोनवणे, ज्ञानेश्वर पाटोळे करीत आहेत.