मध्य प्रदेशातील सागर येथील घटना
सागर (वृत्तसंस्था ) दि. ०४ ऑगस्ट २०२४ | मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील शाहपूर येथे रविवारी एक भीषण अपघात झाला. भागवत कथेदरम्यान शिवलिंग बांधणाऱ्या लोकांवर भिंत पडली, अपघातात नऊ मुलांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. यानंतर मदतकार्य सुरू केले असून ढीगाऱ्याखाली दंबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केले.
आज सकाळी मुसळधार पावसानंतर शाहपूर शहरातील एका मंदिराची भिंत कोसळली. या अपघातानंतर अनेक मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी ८.३० च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. सागरचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार काही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर घटना स्थळावरून सर्व माती आणि ढीगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काल रात्रीपासून येथे मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे ही भिंत पडल्याचे समजते. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ मुलांचे वय १० ते १५ वर्षे आहे.
या मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना अचानक मंदिराची भिंत कोसळली. श्रावणमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी शिवलिंगाची निर्मिती करण्यात येत होती. शिवलिंगाच्या उभारणीत अनेकांचा सहभाग होता. यामध्ये अनेक लहान मुले देखील सहभागी झाली होती. यावेळी भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू झाला.