• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘मनपा’च्या स्व.अटलजी बिहारी वाजपेयी उपवन उद्यानाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

साधारण 1100 चौ.मी.चा संपूर्ण परिसर ऑक्सिजननिर्मितीसाठी पोषक ठरणार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 19, 2021
in सामाजिक
0
‘मनपा’च्या स्व.अटलजी बिहारी वाजपेयी उपवन उद्यानाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव, दि. 18 – जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव व केंद्र शासनाच्या अमृत हरीत क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रायसोनीनगरात उभारण्यात आलेल्या स्व.अटलजी बिहारी वाजपेयी उपवन उद्यान लोकार्पण सोहळा शुक्रवार,दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पार पडला. पालकमंत्री तथा स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.

साधारणपणे 1100 चौ.मी. जागेत उभारण्यात आलेल्या या उपवन उद्यानात चिमण्या, कबुतर, कावळे आदी पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढावी, यासाठी वृक्षलागवड करण्यात आलेली असून, लॉन, जॉगिंग ट्रॅकचीही या ठिकाणी सुविधा आहे. त्यामुळे हे उद्यान परिसर अतिशय निसर्गरम्य बनले असून, ऑक्सिजननिर्मितीसाठी पोषक ठरणार आहे. प्रभाग क्र. 13 च्या नगरसेविका ज्योती चव्हाण व प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी हे उद्यान अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व परिश्रम घेतले.

माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होते. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील व महापौर जयश्री महाजन यांची विशेष उपस्थिती होती. तर महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, नितीन लढ्ढा, सीमा भोळे, महापालिका स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, नगरसेविका सुरेखा तायडे, अंजनाबाई सोनवणे, गायत्री राणे, अ‍ॅड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, नगरसेवक जितेंद्र मराठे, नितीन बरडे, विक्रांत ऊर्फ गणेश सोनवणे, विरेंद्र खडके, महापालिका शहर अभियंता अरविंद भोसले, शाखा अभियंता चंद्रकांत सोनगिरे आदींसह रायसोनीनगरातील ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्यानाचे मक्तेदार श्री गजानन एन्टरप्राइजेस, जळगाव हे आहेत.

Tags: जळगाव महानगरपालिका
Next Post
गणेश विसर्जनासाठी पोलीस विभाग सज्ज VIDEO

गणेश विसर्जनासाठी पोलीस विभाग सज्ज VIDEO

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ

February 4, 2023
लाडवंजारी समाज बांधवांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतली भेट
जळगाव जिल्हा

लाडवंजारी समाज बांधवांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतली भेट

February 4, 2023
कजगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग तरुणींना सायकल वाटप
जळगाव जिल्हा

कजगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग तरुणींना सायकल वाटप

February 3, 2023
शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न
जळगाव जिल्हा

शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न

February 2, 2023
कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
जळगाव जिल्हा

कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

February 1, 2023
मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
जळगाव जिल्हा

मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

January 31, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.