जळगाव, दि. 19 – गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील मेहरूण तलाव येथे महानगरपालिकेच्या वतीने श्रींच्या मूर्ती विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आलीये. यासाठी लाकडी तराफे तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे निर्माल्य गोळा करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने निर्माल्य संकलन वाहन तयार केले आहे.
याठिकाणी घरगुती गणेश मूर्तींसह सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे देखील विसर्जन केले जाते. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील मिरवणूक काढण्यास बंदी आहे. शक्यतोवर घरगुती गणेश मूर्ती संकलन केंद्रांवर जमा कराव्या, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस विभाग सज्ज असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सांगितले.
पहा.. व्हिडिओ