जळगाव | दि.२८ जुलै २०२४ | जळगाव जिल्हा होमगार्ड मधील विविध पथकांच्या ठिकाणी रिक्त असलेल्या ३२५ नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्याचे आयोजन केलेले आहे. दि. १४ ऑगस्ट, २०२४ चे सायं. ५:०० वाजे पावेतो. ऑनलाईन अर्ज मगविणेत येत आहे.
होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahglogin1.php या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छीत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करून अर्ज करावा, असे आवाहन होमगार्ड जिल्हा समादेशक तथा, अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.