जळगाव, दि. 15- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत जळगावात बुधवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे जोरदार निषेध करण्यात आला. दरम्यान दरेकर यांच्या प्रतिमेवर शाई शिंपडत, जोडे मारण्यात आले. यावेळी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
जोपर्यंत दरेकर माफी मागत नाही तोपर्यंत, ते जिथे दिसतील तिथे राष्ट्रवादी महिला त्यांचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही.. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मंगला पाटील यांनी दिला.
पहा.. व्हिडिओ