• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ई-पीक पाहणी साठी जिल्हाधिकारी पोहचले शेतकऱ्याच्या बांधावर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 15, 2021
in कृषी
0
ई-पीक पाहणी साठी जिल्हाधिकारी पोहचले शेतकऱ्याच्या बांधावर

धरणगाव, दि. 15 – महसूल विभाग राबवित असलेल्या ई पीक पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे थेट धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या बांधावर पोहुचन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी ई पीक पाहणी कार्यक्रम  राबवीत आहे. याद्वारे शेतकऱ्याच्या शेतातील पीक क्षेत्रातील पीक तेच उताऱ्यावर अपेक्षित आहे. तर गेल्या तीन आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे झाले असुन लवकारत लवकर मदत पोहचविण्यासाठी नियोजन करणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी अधिकारी राऊत म्हणाले की, ई पीक पाहणी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा व शेतकऱ्यांच्या हिताचा कार्यक्रम महसूल विभाग राबवीत आहे. शेतकऱ्यांमध्ये चांगल्याप्रकारे जनजागृती केल्यामुळे व त्यांच्यावर असलेल्या परिवेक्षक यांमुळे जिल्ह्यात 33 टक्के खातेदारांची नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील आठ लाखाहून जास्त खातेदारांनी नोंदणी झाली असून राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. ई पीक नोंदणीसाठी तीस तारखेपर्यंत मुदत वाढ दिलेली असून शेतकऱ्यांनी तंत्र समजून घेतल्यास भविष्यात शासन जे उपक्रम राबविते त्यामध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येईल याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी ची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे त्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्या ठिकाणी जाऊन तात्काळ पंचनामे करण्यात येत आहे. हे सर्व अहवाल शासनाला पाठवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या वेळी जिल्हाधिकारी यांनी आव्हान केले की शेतकऱ्यांसाठी हे अडचणीचे प्रसंग असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी व मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून ती मदत लवकरात लवकर पोहोचवण्याचे नियोजन करू असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

ई पीक साठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक या गावात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते यावेळी त्यांनी ई पीक पाहणी करून शेतकऱ्यांची इ पीक नोंदणी बाकी होती ती करून घेतली.यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत याचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांत विनायक गोसावी, तहसीलदार नितींकुमार देवरे, तलाठी आरिफ शेख, मंडलाधिकारी बाविस्कर ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


 

Next Post
औट्रम घाट (कन्नड) औरंगाबाद ते धुळेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या दुचाकी व हलक्या लहान वाहनांसाठी आजपासून खुला

औट्रम घाट (कन्नड) औरंगाबाद ते धुळेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या दुचाकी व हलक्या लहान वाहनांसाठी आजपासून खुला

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add