• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ओबीसी समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप करत, भाजप आघाडी सरकार विरोधात करणार आंदोलन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 15, 2021
in राजकीय
0
ओबीसी समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप करत, भाजप आघाडी सरकार विरोधात करणार आंदोलन

जळगाव, दि.14 – ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविल्याचा आरोप करत आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे दि.15 सप्टेंबर बुधवार रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी केली.

आमदार भोळे यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्षच म्हणतो आहे. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवारी तालुका पातळी पर्यंत आंदोलन केले जाईल, असेही आमदार भोळे (राजूमामा) यांनी नमूद केले.

या पत्रकार परिषदेसाठी जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष नंदु महाजन, ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस भारती सोनवणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅड संजय महाजन, महानगराध्यक्ष जयेश भावसार, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हा पदाधिकारी महेश चौधरी, मनोज भांडारकर, गणेश माळी, प्रकाश पंडित आदी उपस्थित होते


 

Next Post
ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात भाजपचे राज्यस्तरीय आंदोलन

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात भाजपचे राज्यस्तरीय आंदोलन

ताज्या बातम्या

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
जळगाव जिल्हा

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन
कृषी

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 4, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
आरोग्य

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group