जळगाव, दि. 14 – आज देशभरात हिंदी भाषा दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचे महत्व सर्वाना कळावे. या उद्देशाने प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी मंंगळवारी शाळेत ‘बहुरंगी कौशल्य’ उपक्रमाचे आयोजन केले. यात ऑनलाईन पद्धतीने चित्रकला, घोष वाक्य फलक, वक्तृत्व, भाषण, कविता लेखन, निबंध लेखन अशा बहुरंगी स्पर्धाचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून आनंदायी शिक्षणाचा आनंद अनुभवला. दरम्यान विद्यार्थ्यांनी हम सब का अभिमान हैं हिंदी, भारत की शान हैं हिंदी, एकता की जान है, हिंदी देश की शान है।, राष्ट्रभाषा के बिना राष्ट्र गूंगा है। अशा पद्धतीचे घोषवाक्य असलेले फलक तयार केले. पालकांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमांचा आनंद घेतला.
विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल यांनी हिंदी भाषा दिवसाचे महत्व सांगत उपक्रमाचे कौतुक केले. तसेच अध्यक्षा यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देने महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले. मुख्याध्यपिका शोभा फेगडे यांनी पालकांना विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपक्रमात सहभाग घ्यावा यासाठी प्रोत्साहित करावे हे सांगितले.
याप्रसंगी संध्या अट्रावलकर, संगीता गोहील, नम्रता पवार, अविदीप पवार, सारिका तडवी, रमेश ससाणे आदींसह शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.