• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॕम्प महत्त्वाचा.. – रणजीपटू समद फल्लाह

जैन स्पोर्टस अॕकडमीच्या समर कॕम्प -२०२४ चा समारोप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 20, 2024
in क्रिडा
0
सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॕम्प महत्त्वाचा.. – रणजीपटू समद फल्लाह

जळगाव दि.२० – ‘आरोग्यपूर्ण डायट, नैतिकता, शिस्त आणि सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॕम्पचे आयोजन खुप महत्त्वपूर्ण ठरले. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपिठ उपलब्ध करून खेळ, खेळाडूंचे भवितव्य घडविले जात आहे, यासाठी जैन इरिगेशनचे अशोक जैन, अतुल जैन सदैव प्रयत्न करत आहे.’ असे मनोगत रणजीपटू समद फल्लाह यांनी व्यक्त केले.

जैन स्पोर्टस ॲकडमीचा समर कॕम्प -२०२४ चा समारोप झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय कॕरम खेळाडू आयशा मोहम्मद हिने प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून जैन परिवारातील अभंग जैन होते. सोबत आंतरराष्ट्रीय कॕरम खेळाडू आयशा मोहम्मद, संदीप दिवे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी रणजीपटू समद फल्लाह, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, जैन स्पोर्टस ॲकडमीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे, सुनील व्यवहारे, आविनाश लाठी, संजय पवार उपस्थित होते.

जैन इरिगेशन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, कांताई नेत्रालय यांच्या सहकार्याने दि.१५ एप्रिल ते १८ मे पर्यंत समर कॕम्पचे आयोजन केले होते. क्रिकेट, बॕडमेंटन, बुध्दिबळ, बास्केटबाॕल, तायक्वांदो, फुटबाॕल या खेळांमध्ये ४१० खेळाडूंनी सहभाग घेतला. अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेंकडरी, कांताई सभागृह याठिकाणी समर कॕम्प चे आयोजन केले होते. २०२३-२४ या वर्षात जे खेळाडू यशस्वी झाले अशा १०१ खेळाडूंचा गौरव केला गेला. सुयश बुरूकुल यांनी समर कॕम्प विषयी सांगितले. सूत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले.

समर कॕम्प मधील यशस्वी खेळाडू..
समर कॕम्पमध्ये बॕडमेंटनमध्ये उत्कृष्ट खेळाडू राखी ठाकूर, गणेश पंडीत,मोकक्षा जाखेटे, शोनब माहेश्वरी, बाॕस्कटेबाॕल रिशीता वाणी, चंद्रविर परदेशी, युदीप लाडवंजारी, विरेन वसराणी, गार्गी वाणी, पुर्वा हटकर, कॕरममध्ये धृव बारी, धिरज घुगे, बुध्दिबळ राघव वाघळे, हर्षदा पाटील, पुनित वारके, विद्या बागुल फुटबाॕलमध्ये कार्तिक पाटील, दर्श बडगुजर, आरव सोनी, चेतन चौहान, निखील साळुंखे, तायक्वांदो मध्ये तनिया सुतार, वंश सोनवणे, कोमल घढे, दर्शन कांडवे, सिमरण बोरसे, तर क्रिकेट मध्ये उत्कृष्ट फलंदाज दर्शन पवार व विशाल चौधरी, उत्कृष्ट गोलंदाज रितेश हिवरकर व निर्भय घुगे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अंश लोणकलकर, स्वामी खंबायते, उत्कृष्ट देहबोली हिमांशु चौधरी व अर्थव पांढरे, उत्कृष्ट परिक्षार्थी पुष्कर बुवा, उदयोमुख खेळाडू आर्यन पाटील याला चषक, बॕट, ग्लोज दिले. तर समर कॕम्प मधील बेस्ट ट्रेनी रोहन चौधरी याचा चषक, बॕट, ग्लोजसह हेल्मट संपूर्ण किट देण्यात आले. समर कॕम्प मध्ये जैन स्पोटर्स ॲकडमीमधील सर्व प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.


Next Post
भाजपाच्या ओबीसी मोर्चा तर्फे ममता बॅनर्जी विरोधात निषेध आंदोलन

भाजपाच्या ओबीसी मोर्चा तर्फे ममता बॅनर्जी विरोधात निषेध आंदोलन

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group