रावेर, दि.२२ – रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेचे उमेदवार श्रीराम पाटील आज रावेर तालुक्यातील मतदारांच्या भेटी घेण्यासठी सकाळी रावेर येथून निघाले. मतदारांच्या भेटी घेत असतांना अचानक पावसाला सुरुवात झाली मात्र न थांबता त्यांनी थेट मतदारसंघात जात नागरिकांच्या भेटी घेत संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी रावेर तालुक्यातील भोकरी, केऱ्हाळा, अहिरवाडी, करजोद, खानापूर, वाघोड, मोरगाव, खिरवड येथील नागरिकांच्या भेटी घेतल्यायावेळी आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी किसान जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेना (उबाठा गट) जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, प्रकाश पाटील, यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वघटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.