• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मेगा रिचार्ज प्रकल्प अपूर्णच

अरुणभाई गुजराथी यांनी सुनावले खडे बोल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 23, 2024
in राजकीय
0
लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मेगा रिचार्ज प्रकल्प अपूर्णच

यावल, दि. २३ – रावेर, यावल व चोपडा या तालुक्यांना वरदान ठरू पाहणारा मेगा रिचार्ज प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेतच आहे. तर या तालुक्यांमध्ये केळीवर प्रक्रिया होणे आवश्यक असताना खासदारांच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही असे खडे बोल विधानसभा माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांनी सुनावले. रावेर लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ यावल येथे कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, उमेदवार श्रीराम पाटील, रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, हाजी शब्बीर शेख, लीलाधर चौधरी, विनोद पाटील, लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुकेश येवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, शिवसेना तालुकाध्यक्ष रवींद्र सोनवणे, राष्ट्रवादीचे किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

रावेर, यावल, चोपडा हा केळी पट्टा आहे. मात्र या भागातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. केळी पीक विम्याचा प्रश्न लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सुटू शकलेला नाही अशी टीका यावेळी अरुणभाई गुजराथी यांनी केली. केंद्र सरकारने महागाई वाढवली आहे. सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. त्यांना आधार देण्याऐवजी वाऱ्यावर सोडले आहे. विरोधकांनी आपले नेते हिरावले पण आपली हिम्मत कमी झालेली नाही. असे सांगत अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील हे प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त केला.

Next Post
महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ मोठ्या मताधिक्याने निवडून येणार..! व्यापाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास

महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ मोठ्या मताधिक्याने निवडून येणार..! व्यापाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास

ताज्या बातम्या

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा
जळगाव जिल्हा

पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा

June 17, 2025
एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ
खान्देश

एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

June 17, 2025
शेतात वीज पडून २५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना
कृषी

शेतात वीज पडून २५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

June 17, 2025
शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण

June 16, 2025
निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा
जळगाव जिल्हा

निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

June 16, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group