जळगाव, दि.२३ – पहिल्या महिला खासदार होण्याची संधी स्मिताताईंना मिळाली असल्याचे म्हणत मोठ्या मताधिक्याने त्या निवडून येतील असा व्यापारी शहरातील बांधवांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाती महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी व्यापाऱ्यांची भेट घेतली.
अतिशय सकारात्मक अशी ही भेट होती. अनेक व्यापाऱ्यांनी यावेळी देखील पंतप्रधान मोदी यांच्यावर आपला विश्वास असल्याचे सांगितले. अत्यंत उत्साही अश्या वातावरणात ही भेट पार पडली असल्याचे उमेदवार स्मिता वाघ यांनी सांगितले.
आमदार सुरेश भोळे (राजुमामा), जिल्हा महानगर अध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, दीपक सूर्यवंशी, लोकसभा प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी, अॅड सुचीता हाडा, डॉ. केतकी पाटील, राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाठी, प्रकाश बालाणी, सुनील खडके, मुकुंदा बोरकर, किशोर चौधरी, सुशील हासवानी, प्रियंका सोनी, जितेंद्र मराठे, महेश पाटील, आनंद सपकाळे, विजय वानखेडे, स्वप्निल साखळीकर, नितीन इंगळे, मिलिंद चौधरी, राहुल घोरपडे, मयूर भदाणे, भगतसिंग निकम, धीरज पुरोहित, मिलिंद सोनवणे, अक्षय मेघे, अविनाश पारधे, प्रताप बनसोडे, कुणाल भावसार, इरफान शेख, जावेद खाटे, आरपीआयचे अनिल अडकमोल, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील, विराज देशमुख, मिलिंद सोनवणे, शिवसेनेचे श्यामकांत कोकटा यासह असंख्य महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.