जळगाव, दि.१९ – सृजनाचे प्रतिक असलेल्या वसंत ऋतुमध्ये येणारा होळी हा सण सर्वत्र २४ मार्च रोजी साजरा होणार असून होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. मात्र रंगपंचमीला वापरात येणारे रासायनिक रंग त्वचा आणि आरोग्यासाठीही घातक आहेत. त्यानुषंगाने, श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वसंत ऋतुत बहरणाऱ्या विविध पाने, फळे आणि फुलांपासुन नैसर्गिक रंग बनवून पर्यावरणपुरक रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी दिला.
यावेळी उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनीही विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगाचे फायदे आणि रासायनिक रंगाचे अपाय विद्यार्थ्यांना समजावून सांगीतले. विद्यार्थ्यांनीही विविध रंगीबेरंगी पाने-फुलं, फळापासुन नैसर्गिक रंग तयार करून या रंगपंचमीला नैसर्गिक रंग वापरण्याची शपथ घेतली आहे.