• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

झुलेलाल वॉटर पार्कमध्ये भव्य होळी महोत्सव : धमाल उत्सवाची सुवर्ण संधी!

२३ मार्चपासून वॉटर पार्क होणार सुरू

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 20, 2024
in मनोरंजन
0
झुलेलाल वॉटर पार्कमध्ये भव्य होळी महोत्सव : धमाल उत्सवाची सुवर्ण संधी!

जळगाव, दि.२० – खान्देशातील एकमेव सर्वात मोठ्या म्हणून ख्यात असलेल्या शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टचा तिसरा सिझन लवकरच सुरू होत आहे. यात भव्य होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये धमाल मस्तीसह आपला पारंपरीक महोत्सव साजरा करण्याची संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे.

शिरसोली रोडवरील अनुभूती स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या पाचदेवी माता मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टमध्ये यंदा तिसरे पर्व हे २४ मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. आधीच्या दोन वर्षांमध्ये खान्देशातील आबालवृध्दांचा येथे प्रचंड प्रतिसाद लाभला असून यंदा तर अजून बर्‍याच नव्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. यात प्रामुख्याने सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा वेव्ह पुल तयार करण्यात येत असून याच्या सोबतीलाच गेम झोन देखील लोकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, यंदा होळीनिमित्त येथे गेल्या वर्षीप्रमाणेच दिनांक २५ मार्च रोजी ‘होली धमाका-होली फुलोवाली’ या स्पेशल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात गायिका प्रिया आणि डिजे साक्षी यांच्या संगतीने दिवसभर शानदार संगीतमय कार्यक्रम होणार आहे. याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ढोल धमाका असून यात दिल्ली येथील ढोल पथकाच्या तालावर उपस्थितांना बहारदार नृत्य करता येणार आहे. हा कार्यक्रम फक्त फॅमिली मेंबर्ससाठी असून याचे तिकिट मूल्य प्रौढांसाठी प्रत्येकी ५९९ तर बालकांसाठी ४९९ रूपये इतके आहे. या संदर्भात बुकींगसाठी आपण ९८ ९० ७७ ०८ ५९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन झुलेलाल वॉटर पार्कच्या वतीने संचालक नीरज जेसवानी यांनी केले आहे.

झुलेलाल वॉटर पार्कमध्ये अगदी सुरक्षित वातावरणात आपल्या कुटुंबासह धमाल मस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. लहान मुलांपासून ते तरूणांसाठी वॉटर राईडची सुविधा उपलब्ध असून भव्य जलतरण तलावही येथे आहे. याच्या सोबतीला येथे अतिशय स्वादिष्ट खाद्यपदार्थ व विविध स्नॅक्सदेखील उपलब्ध आहेत. नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे संपर्क साधण्याचे आवाहन संचालक नीरज जेसवानी यांनी केले आहे.

Next Post
मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व्हा. चेअरमन पदाची निवड

मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व्हा. चेअरमन पदाची निवड

ताज्या बातम्या

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक
खान्देश

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक

June 19, 2025
शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

June 19, 2025
शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
खान्देश

शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 19, 2025
सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन
जळगाव जिल्हा

सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन

June 18, 2025
बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !
जळगाव जिल्हा

बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !

June 18, 2025
थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group