• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

पथसंचलन आणि पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध; ५७ जणांवर गुन्हे दाखल, १७ जणांना अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 27, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा, राजकीय
0
किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

जळगाव, प्रतिनिधी : यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनादरम्यान तसेच पोलिसांवर झालेली दगडफेक ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. काही समाजकंटकांकडून अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

किनगाव येथील दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करण्यात यावे, अशी ठाम मागणी सोमय्या यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

विजयादशमीनिमित्त अनेक वर्षांनंतर पोलिसांकडून पथसंचलनाला परवानगी देण्यात आली होती. मात्र, या वेळी घडलेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण झाले. या प्रकरणी जळगाव पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ५७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, १७ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल किरीट सोमय्या यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना त्यांनी आगामी काळात राज्यात समान नागरी कायदा लागू होणार असल्याचेही नमूद केले.

या पत्रकार परिषदेला आमदार अमोल जावळे, महापौर दीपमाला काळे, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा पदाधिकारी डॉ. केतकी पाटील, नगरसेवक अरविंद देशमुख यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


 

ताज्या बातम्या

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी
गुन्हे

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

October 27, 2026
एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा
खान्देश

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश
खान्देश

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

October 27, 2026
रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया

October 27, 2026
कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
गुन्हे

कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

October 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add