• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मृत्यूच्या दारातून रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात रुग्णावर परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 27, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
मृत्यूच्या दारातून रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात रुग्णावर परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव : प्रतिनिधी हृदयाचे ठोके अत्यंत कमी होणे, चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे आणि त्यानंतर बेशुद्धावस्था निर्माण होणे, ही लक्षणे गंभीर हृदयविकाराची धोक्याची घंटा ठरू शकतात. अशाच आपत्कालीन परिस्थितीत ५५ वर्षीय रुग्णाला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन हृदयविकार तज्ज्ञांनी तातडीने तपासण्या करून परमनंट पेसमेकरची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या वेळेवर केलेल्या उपचारांमुळे रुग्णाला जीवदान मिळाले असून, डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या हृदयविकार तज्ज्ञांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी की, संबंधित ५५ वर्षीय रुग्णाला हृदयाचे ठोके कमी होणे, चक्कर येणे आणि डोळ्यांसमोर अंधारी येणे असा त्रास जाणवत होता. प्रकृती अधिक बिघडल्याने रुग्ण बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल झाला.

रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. अशा परिस्थितीत हृदयाचे ठोके पुरेशा प्रमाणात न पडल्यास मेंदूसह शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळ न दवडता योग्य निदान आणि उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे होते.
र्सीजी, टूडी इको तपासणीनंतर तातडीने निर्णय
रुग्णालयातील हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या हृदयाची ईसीजी आणि टूडी इको तपासणी तातडीने करण्यात आली. तपासण्यांच्या निष्कर्षांच्या आधारे रुग्णाच्या हृदयाच्या ठोक्यांचे नियमन करण्यासाठी परमनंट पेसमेकर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली आणि डॉ. सिद्धेश्वर खांडे यांच्या टीमने आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पार पाडत परमनंट पेसमेकरची शस्त्रक्रिया यशस्वी केली.परमनंट पेसमेकर हे हृदयाचे ठोके आवश्यकतेपेक्षा कमी होत असताना त्यांचे नियमन करण्यास मदत करणारे उपकरण आहे. हृदयाच्या ठोक्यांमधील गंभीर अनियमितता असलेल्या निवडक रुग्णांसाठी हा उपचार जीवनरक्षक ठरू शकतो. या रुग्णाच्या बाबतीतही तातडीने निदान करून योग्य उपचार केल्यामुळे पुढील गंभीर धोका टाळण्यास मदत झाली.

हृदयाचे ठोके खूप कमी होणे, वारंवार चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा बेशुद्ध पडणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. अशा वेळी रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करून हृदयाची तपासणी करणे आवश्यक असते. काही रुग्णांमध्ये हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यासाठी परमनंट पेसमेकरची गरज भासू शकते.

या रुग्णाच्या बाबतीत वेळेवर तपासणी आणि तातडीने उपचार करणे महत्त्वाचे ठरले. त्यामुळे नागरिकांनी अशी लक्षणे दिसल्यास घरगुती उपायांवर वेळ न घालवता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. सिध्देश्वर खांडे, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय


 

ताज्या बातम्या

मृत्यूच्या दारातून रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात रुग्णावर परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

मृत्यूच्या दारातून रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात रुग्णावर परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया

October 27, 2026
कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
गुन्हे

कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

October 27, 2026
मुलीच्या साखरपुड्यापूर्वीच काळाचा घाला! शेतात विजेच्या धक्क्याने शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
गुन्हे

मुलीच्या साखरपुड्यापूर्वीच काळाचा घाला! शेतात विजेच्या धक्क्याने शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

October 27, 2026
दिवाळीनिमित्त जळगाव शहरात मोकळ्या प्लॉटमधील स्वच्छता मोहीम
खान्देश

दिवाळीनिमित्त जळगाव शहरात मोकळ्या प्लॉटमधील स्वच्छता मोहीम

October 27, 2026
शहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
जळगाव जिल्हा

शहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

October 27, 2026
मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान; चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ
आरोग्य

मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान; चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ

October 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add