जळगाव : प्रतिनिधी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून, महापौर दीपमाला काळे यांनी लोकसहभागातून शहरासाठी ४ जेसीबी उपलब्ध करून दिले आहेत. अनेक प्रभागांमध्ये कचरा उचलण्यासाठी वाहने कमी पडत असल्यामुळे, या जेसीबीच्या साहाय्याने ऐन सणाच्या काळात स्वच्छता केली जाणार आहे.

महापौर दीपमाला काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील १० दिवसांत महापालिकेच्या सर्व वॉर्डांमधील मोकळ्या प्लॉट मधला कचरा हटवून संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय महामार्गाच्या दुतर्फा पडलेला कचरा, वेस्ट मटेरियल, झाडे झुडपे आणि कचऱ्याचे ढीग पुढील १० दिवसांत पूर्णपणे उचलण्याचे स्पष्ट निर्देश महापौर काळे यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. या उपक्रमामुळे दिवाळीपूर्वी जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.









