जळगाव, दि.११ – केशवसमृती प्रतिष्ठान संचलित कौशल्य विकास विभागाच्या वतीने सेवावस्ती विभाग, हरिविठ्ठल नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी संगणक प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ करण्यात आला. हरिविठ्ठल नगर, खंडेराव नगर, हुडको, वाघ नगर परिसरातील मुली व महिलांना कॉम्पुटरचे प्राथमिक ज्ञान मिळाले पाहिजे व त्यांचा माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान अद्यावत होण्यासाठी या संगणक प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
वर्गाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ इलाईटचे अध्यक्ष व उद्योजक अजित महाजन यांचे हस्ते झाले तर यावेळी मुख्य अतिथी म्हणून कौशल्य विकास विभागाचे प्रकल्प प्रमुख दिलीप महाजन, सेवावस्ती विभाग प्रकल्प प्रमुख डॉ. विवेक जोशी, सहप्रकल्प प्रमुख मनिषा खडके, सह प्रकल्प प्रमुख भानुदास येवलेकर उपस्थित होते.
नोकरी अथवा व्यवसायच्या दृष्टिने संगणकीय साक्षर होणे हि काळाची गरज असून केशवस्मृती प्रतिष्ठान द्वारा वस्ती भागातील अल्पशिक्षित महिलांसाठी हा उपक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगत केशवस्मृती नेहमी समाजाच्या गरजा ओळखून त्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे अजित महाजन यांनी बोलताना सांगितले.
दररोज एक तास प्रात्यक्षिकच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे व आगामी काळात त्यांना रोजगार अथवा नोकरीसाठी प्रयत्न याप्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती दिलीप महाजन यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा खडके तर सूत्रसंचालन स्नेहा तायडे यांनी केले. यशस्वितेसाठी सेवावस्ती विभागातील महिला सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.