जळगाव, दि.०९ – भारतीय जनता पार्टी जळगाव शहर, ग्रामीण, व अमळनेर विधानसभेची संयुक्त बैठक शनिवारी नव्यानेच तयार झालेल्या भाजपा कार्यालय, जी एम फाउंडेशन येथील अद्यावत असलेल्या कार्यालयात पहिलीच बैठक संपन्न झाली. तसेच याप्रसंगी विकसीत भारत रथाचे लोकार्पण करण्यात आले.
जळगाव लोकसभा निवडणूक संदर्भात या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले व लोकासभा मिशन-२०२४ ची सुरवात करण्यात आली. यावेळी आ. सुरेश भोळे (राजुमामा), जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, उज्वला बेंडाळे, प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीस विधानसभा निवडणुक प्रमुख विशाल त्रिपाठी, चंद्रशेखर अत्तरदे, विठ्ठल पाटील, मनोज भांडारकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील यानी सूत्रसंचालन केले.
दरम्यान विकसीत भारत रथाचे लोकार्पण आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या हस्ते करण्यात आले असून सहा विधानसभेत हे रथ केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती सादर करणार आहेत. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.