जळगाव, दि.०७ – मोहाडी रोड वरील शासकीय महिला रुग्णालयाच्या परिसरातून विविध प्रकारचा एक लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी चोरून नेला होता. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. शासकीय महीला रुग्णालयाचे बांधकाम सुरु असलेल्या साईटवर खोलीचा कडीकोंडा तोडुन अज्ञातांनी साहीत्य चोरुन नेल्या प्रकरणी मक्तेदार आयुष मणियार यांच्या फिर्यादीवरून अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या माहितीनुसार तीनही संशयित तांबापुरात असल्याचे कळाले, त्याप्रमाणे पोलीस पथकाने तिघांच्याही मुस्क्या आवळल्या. यात सतबिरसिंग बलवंतसिंग टाक (वय- २१), गुरुजितसिंग सुजाणसिंग बावरी, (वय- २२), तंजीम बेग नसीम बेग मिर्झा (वय- ३६) सर्व राहणार तांबापुर, जळगाव अटक करण्यात आली असून त्यांचे कडुन चोरी झालेल्या साहीत्यापैकी ९७०००/- रुपये किंमतीचे साहीत्य व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
तपासादरम्यान गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी याने नरेंद्र मानसिंग पाटील, रा. अयोध्या नगर, जळगाव यांचे कडे मागील वर्षी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. सदर बाबतीत एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात यापुर्वी गुन्हा दाखल आहे. सदर आरोपी सतबिरसिंग याच्यावर यापुर्वी चोरी घरफोडीचे १९ गुन्हे, गुरजितसिंग याच्यावर ११ गुन्हे तर तंजीम बेग मिर्झा याच्यावर ३ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दिपक जगदाडे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, सचिन मुंढे, पो.ना. किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, पो.कॉ. मुकेश पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, किरण पाटील, छगन तायडे, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे यांनी केली आहे.