जळगाव, दि.०८ – जागतीक महिला दिनाचे औचित्य साधत जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडुन महिला दिन सप्ताह साजरा केला जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी पोलीस कवायत मैदानापासुन महिलांसाठी ३ किमी व ५ किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातील महिला अधिकारी, अंमलदार, पोलीस कुटुंबिय व जळगाव शहरातील महिला यांनी सहभाग घेतला. स्पर्धेला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवुन स्पर्धेची सुरुवात केली. स्पर्धा एकुण ४ वयोगटामध्ये घेण्यात येवुन त्यात प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या महिलांचा मेडल व प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिह, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, माजी महापौर जयश्री महाजन, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रमोद पवार, यांच्यासह इतर महिला अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उपनिरीक्षक रेश्मा अवतारे व पोलीस वेल्फेअर टिम यांनी परीश्रम घेतले.