भुसावळ, दि.०८ – लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध धंदे, जुगार यावर कारवाई सुरू असताना तालुक्यातील कुऱ्हा या ठिकाणी फायटर कोंबड्यांच्या झुंजी लावून पैशावर हार जीत च्या खेळावर कारवाई करत भुसावळ तालुका पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले आहे. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
सविस्तर वृत्त असे की, भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये कुऱ्हा या गावी एका शेताच्या बाजुला काही लोक बसुन ते फायटर कोंबड्यांच्या झुंझी लावुन त्यावर पैशांचा हार जितचा खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
मौजे कुऱ्हा शिवारात रईस बागवान यांच्या लिंबुच्या मळ्या शेजारी असलेल्या परीसरात १५/१६ जण हे कोबंड्यांच्या झुंझी लावुन त्यावर पैशांचा हार जितचा खेळ खेळतांना मिळुन आले असून ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्याकडून दोन फायटर कोंबडे सहा मोबाईल १४ मोटर सायकली असा एकुण ५,८६,६००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यात आरोपी शेख सईद शेख सादीक (वय-२३), शेख जावेद शेख हाफीज (वय-३८), आशिष राजेश सोनी, (वय-२१), नेलसन लेनीन पेट्रो (वय – ४३), शेख आरीफ शेख युसुफ (वय – ३१), मोसीन शेख युसुफ (वय – ३२), शेख सलमान शेख सलीम (वय-२६), रशीद सैय्यद निसार, (वय-४२), शेख शेहबाज शेख अकबर (वय-२३), अर्जुन बादल गरड (वय-२४), शेख इमाम शेख याकुब (वय-३८) तर इतर ५ / ६ अज्ञातांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाणे येथे सी सी टी एन एस गु.र.नं.४१/२०२४ कलम १२ (ब), (क) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन जगताप, सपोनि विशाल पाटील, सफौ विठ्ठल फुसे, पोहेकॉ युनुस शेख, संजय तायडे, प्रेमचंद सपकाळे, संजय भोई, पोना जितेंद्र सांळुखे, पोकॉ विशाल विचवे, जगदिश भोई तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भुसावळ येथे नेमणूक असलेले पोहेकॉ सुरज पाटील, संकेत झांबरे यांनी केली आहे.