जळगाव, दि.०४ – भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा युवा मोर्चा व महिला मोर्चा आणि ऑटो स्कूल व्हॅन वाहतुक आघाडी जिल्हाध्यक्ष पदी पदाधिकाऱ्यांची नुकतीच संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेश पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांनी जळगाव महानगर जिल्ह्यातील युवा मोर्चा व महिला मोर्चा आणि ऑटो स्कूल व्हॅन वाहतुक आघाडी जिल्हाध्यक्ष निवड जाहीर केली.
भाजपा मोर्चा/आघाडी जिल्हाध्यक्ष २०२४ पुढील प्रमाणे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी महेश रमेश पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा पदी भारती कैलास सोनवणे, ऑटो स्कूल व्हॅन वाहतुक आघाडी जिल्हाध्यक्ष पदी प्रमोद वाणी यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व स्तरातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले जात आहे.