जळगाव, दि.०४ – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त तंबाखू मुक्ती शपथ आणि जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच गुटखा तंबाखू चे दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सर्व शालेय विद्यार्थ्यांनी तंबाखु मुक्तीच्या घोषणा देऊन परिसरातील नागरीकांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यावेळी त्यांनी तंबाखूमुक्ती अभियानाच्या संकल्प मोहिमे विषयी मौलीक मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहशिक्षिका साधना शिरसाट यांनी तंबाखू म्हणजे काय? तंबाखूचा इतिहास, दुष्परिणाम व तंबाखु मोहिमेविषयी मार्गदर्शन केले. सुवर्णा अंबोरे यांनी तंबाखू मुक्तीची सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शपथ दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रूपाली आव्हाड तर उज्वला नन्नवरे यांनी आभारप्रदर्शन केले.