• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाडळसे प्रकल्पास निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

पाडळसे निम्न तापी प्रकल्पाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी‌ केली पाहणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 2, 2024
in जळगाव जिल्हा
0
पाडळसे प्रकल्पास निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव, दि.०२ – पाडळसे प्रकल्पाच्या माध्यमातून अमळनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणार आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी ४८९० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. सात उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करण्यासाठी केंद्राची मदत मिळणार आहे. जून २०२५ पर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडविण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी केंद्र शासनाची मदत घेऊन निधी‌ कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमळनेर तालुक्यातील पाडळसे निम्न तापी प्रकल्प धरणाची आज पाहणी केली. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आले पाहिजे आहे. यासाठी शासन काम करत आहे. केंद्र शासनाने अर्थसंकल्पात चांगले निर्णय घेतले आहेत. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येत आहे. तापी प्रकल्पाचे मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्रात समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्यात केंद्र शासनाला अडचण नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, पाडळसे प्रकल्प दोन जिल्ह्यांना संजीवनी‌ ठरणारा प्रकल्प आहे. आर्थिक निधीसाठी केंद्राच्या मंजुरीसाठी प्रस्ताव आहे. २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पाडळसे‌ निम्न तापी धरण प्रकल्पाची वैशिष्ट्ये..
अमळनेर तालुक्यात तापी नदीवर निम्न तापी प्रकल्प सन १९९९ पासून बांधकामाधीन आहे. एकूण लाभक्षेत्र ४३६०० हेक्टर इतके नियोजित असून त्यासाठी १७.०१ TMC पाणी वापरास मंजुरी प्राप्त आहे. या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, धरणगाव व पारोळा आणि धुळे जिल्ह्यातील धुळे व शिंदखेडा या तालुक्यांना लाभ होईल. हा प्रकल्प दोन टप्यात करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टण्यात १०.४० TMC पाणीवापर करुन २५६५७ हेक्टर लाभक्षेत्र तयार होणार आहे. या प्रकल्पाच्या टप्पा १ साठी २४७२ हेक्टर भूसंपादन आवश्यक असून त्यापैकी ७७० हेक्टर संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीत आहे. तसेच ५ गावे पूर्णतः व ६ गावे अंशतः पुनर्वसन करावे लागणार आहेत, त्यापैकी ३ गावांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाली असून १ गावाची प्रक्रिया प्रगतीत आहे. ७ गावांसाठी जागा निश्चिती करिता कार्यवाही प्रगतीत आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत एकूण ७६३ कोटी रूपये खर्च झाले आहेत. या आर्थिक वर्षात १०० कोटी रूपये एवढी तरतुद आहे. या प्रकल्पाला नुकतीच ४८९० कोटी‌ रूपये एवढ्या अद्यावत किंमतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

 


Next Post
‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा महोत्सवाचे जळगाव केंद्रावरील निकाल जाहीर

‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा महोत्सवाचे जळगाव केंद्रावरील निकाल जाहीर

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group