• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 9, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

​जळगाव, (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देण्यासाठी आणि सदस्यांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव सी.ए. शाखेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत भुसावळ व जळगाव येथे नवीन वाचन कक्षांचे उद्घाटन आणि जळगाव येथील आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरण कार्याचा शुभारंभ नुकताच उत्साहात पार पडला.

​यात भुसावळ येथे २५ आसनक्षमतेच्या वाचन कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. तर जळगाव येथील के.सी.ई. सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालयात ३५ आसनक्षमतेच्या अतिरिक्त वाचन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. हे दोन्ही कक्ष वातानुकूलित असून, यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शांत आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध होणार आहे.

​वाचन कक्षांच्या उद्घाटनासोबतच जळगाव येथील आय.सी.ए.आय. भवन येथे इमारत नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. या प्रकल्पाद्वारे शाखेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून सदस्य व विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगले व्यावसायिक वातावरण निर्माण करण्याचा मानस जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल यांनी व्यक्त केला.

​आय.सी.ए.आय. भवन येथे “नाविन्यपूर्ण ग्रंथालय” सुरू करण्यात आले असून, यात भौतिक पुस्तकांसोबतच डिजिटल अभ्याससामग्री आणि अद्ययावत ज्ञानस्रोत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच कार्यक्रमात जळगाव सी.ए. शाखेच्या नवीन संकेतस्थळाचे (Website) लोकार्पण महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

​“जळगाव सी.ए. शाखा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि सदस्यांच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. या नवीन सुविधांमुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सी.ए. परीक्षेत यश मिळवण्यासाठी मोठी मदत होईल.”
— सी.ए. हितेश आगीवाल (अध्यक्ष, जळगाव सी.ए. शाखा)

​या विविध कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, उपजिल्हाधिकारी जितेन्द्र कुवर, केंद्रीय परिषद सदस्य सी.ए. अर्पित काबरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मुळजी जेठा कॉलेजच्या शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस, सी.ए. अब्दुल्ला अर्सिवाला, सी.ए. रोशन रुणवाल, सी.ए. लक्ष्मिकांत लाहोटी, सी.ए. करण काबरा, सी.ए. नचिकेत जाखेटीया आणि सी.ए. मुकेश अग्रवाल यांची विशेष उपस्थिती होती.

Tags: #jalgaon_city
Next Post
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
जळगाव जिल्हा

डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

April 30, 2026
महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
कृषी

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

April 30, 2026
गॅस सिलेंडर चोरणारी टोळी गजाआड; जळगाव पोलीस दलाची धडाकेबाज कामगिरी
गुन्हे

गॅस सिलेंडर चोरणारी टोळी गजाआड; जळगाव पोलीस दलाची धडाकेबाज कामगिरी

April 30, 2026
शहरातील वीज समस्यांबाबत उपमहापौर आक्रमक; विनापरवाना पोल उभारल्यास खैर नाही!
जळगाव जिल्हा

शहरातील वीज समस्यांबाबत उपमहापौर आक्रमक; विनापरवाना पोल उभारल्यास खैर नाही!

April 29, 2026
श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड
जळगाव जिल्हा

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

April 28, 2026
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न

April 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group