जळगाव, दि.२९ – शिवशाहीर दादा नेवे यांच्या लेखणीतुन लिहिलेले गेलेले राजा रयतेचा हे महानाट्याचे जळगावात आयोजन करण्यात आले आहे. दि.१८,१९ व २० फेब्रुवारी २०२४ रोजी खान्देश सेंट्रल मैदान, येथे होणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव (शिवजयंती) तसेच याच वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यभिषेकाचे ३५१ वे वर्षाचे औचित्य साधुन मोठ्या दिमाखात या महानाट्य सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे हास्य जत्राफेम हेमंत पाटील यांच्या दिग्दर्शनात तसेच श्री शिवरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष व निर्माते जयवर्धन नेवे यांच्या संकल्पनेतुन हे महानाट्य साकार होत आहे.
शहरातील नागरीकांना विनाशुल्क हे महानाट्य दाखविण्यात येणार असुन सात हजार नागरीक पाहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास २०० स्थानिक कलावंत यात सहभागी असतील तसेच तोफा, घोडे, उंट, बैलगाडा, जिवंत साहसी देखावे, वाद्यवृन्द यासह हे महानाट्य साजरा होणार आहे. ४० फुट किल्ला तसेच ८०x४० च्या स्टेज तयार केले जाणार आहे. लोकवर्गणीतुन हे महानाट्य उभे करण्यात येणार असुन या नाटकात सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरीकांनी प्रतिष्ठानला संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस अध्यक्ष जयवर्धन नेवे, उपाध्यक्ष निरंजन देशमुख, सचिव देवीदास पाटील, खजिनदार स्वप्नील नेवे, सदस्य संजय कोरेके, नितीन पाटील, हर्षद जैन, अजय नेवे, आदित्य वाणी, भुषण नेवे, चिन्मय जहागीरदार, विजय नेवे, राहुल सावंत, संकेत नेवे आदी उपस्थित होते.