जळगाव, दि.०२ – येथील कवी, गझलकार ॲड. मुकुंद जाधव यांच्या ‘मनाच्या नजरेतून’ या काव्यसंग्रहाबद्दल मराठी साहित्य मंडळ संस्थेतर्फे त्यांची सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राजस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली. त्यांना कराड जि. सातारा येथील कवी संमेलनात रविवारी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार कवयित्री रेखा दिक्षीत, अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक घुमटकर, उपाध्यक्ष ललीता गवांदे, कवी- संमेलन अध्यक्ष प्राचार्य कवी सुनिल दबडे, डाॅ. नीता बोडके, सिध्दार्थ कुलकर्णी, वर्षा थोरात, हेमा जाधव, पल्लवी भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
ॲड. मुकुंद जाधव हे मुळचे पातोंडा, ता. चाळीसगांव येथील रहिवासी असून गेल्या २३ वर्षापासून जळगाव येथील जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसाय करीत आहे. “मनाच्या नजरेतून” हा काव्यसंग्रह २६ फेब्रुवारी २०२३ रोजी जळगांव येथे प्रकाशित करण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातून ॲड. जाधव यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.