• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रवाश्यांकडून जादा भाडे आकारल्यास ट्रॅव्हल्स कंपनी मालकांवर होणार कारवाई

भाडे आकारणी बाबतचा तक्ता प्रत्येक ट्रॅव्हल्स कार्यालयाच्या बाहेर लावण्याचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 2, 2023
in जळगाव जिल्हा
0
प्रवाश्यांकडून जादा भाडे आकारल्यास ट्रॅव्हल्स कंपनी मालकांवर होणार कारवाई

जळगाव, दि.०२ – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करू नये. भाडे आकारणी बाबतचा तक्ता प्रत्येक ट्रॅव्हल्स कार्यालयाच्या बाहेर लावण्यात यावा.‌ असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

खाजगी प्रवासी बसेसची सेवा पुरविणारे वाहतूकदारांनी संबंधित मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने वाहतूक सेवेकरीता आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या कमाल दीडपट पर्यंत भाडे आकारता येईल. त्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करणाऱ्या खासगी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यात आलेले आहेत.

जळगाव शहरातील खासगी बसेस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात. या कार्यालयाद्वारे खासगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवाशांकडून किती भाडे आकारावे. याबाबतचा तक्ता तयार करुन प्रवाशांच्या सोयीकरीता प्रत्येक खासगी ट्रॅव्हल्स कंपनी कार्यालयात फलक माहिती लावणेबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अधिक भाडे आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा आढळून आल्यास अशा वाहतूक पुरवठादारांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत खटला दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा‌ही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.लोही यांनी दिला आहे.

Next Post
जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

ताज्या बातम्या

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 
क्रिडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 5, 2026
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 5, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप
आरोग्य

गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

August 5, 2026
मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद
Uncategorized

मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद

August 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add