• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला काही तासांतच केले जेरबंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 10, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला काही तासांतच केले जेरबंद

​जळगाव, प्रतिनिधी : अनैतिक संबंधाच्या संशयावरून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने कारवाई करत जेरबंद केले आहे. शिरसोली येथे ९ नोव्हेंबर २०२६ रोजी फिर्यादीचे चुलतभाऊ गोरख विठ्ठल ठाकूर (वय ५५, रा. कारके वस्ती, लोणावळा, पुणे, ह.मु. शिरसोली) हे आलेले असताना, त्यांचा मुकुंदा प्रल्हाद पाटील (वय ४२, रा. शिरसोली) याच्यासोबत वाद झाला. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या गोरख ठाकूर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ सूत्रे हलवली. आरोपी मोबाईल वापरत नसला तरी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरसोली गावात लपून बसलेल्या मुकुंदा प्रल्हाद पाटील याला जेरबंद केले.

चौकशीदरम्यान त्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून लाकडी डांडका व फावड्याच्या साहाय्याने डोक्यात वार करून खून केल्याची कबुली दिली असून, एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड.पो.उप.निरी विजयसिंग पाटील आणि पोलीस पथकातील अंमलदारांनी पार पाडली आहे.


 

ताज्या बातम्या

अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला काही तासांतच केले जेरबंद
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला काही तासांतच केले जेरबंद

November 10, 2026
रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात शास्त्रीय संगीत व सुगम संगीताची पर्वणी
जळगाव जिल्हा

रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात शास्त्रीय संगीत व सुगम संगीताची पर्वणी

November 10, 2026
वरणगाव गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हे

वरणगाव गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

November 9, 2026
दुष्काळी संकटातही बंजारा तांड्यात दिवाळीचा आनंद; मंत्री गुलाबराव पाटलांकडून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही
जळगाव जिल्हा

दुष्काळी संकटातही बंजारा तांड्यात दिवाळीचा आनंद; मंत्री गुलाबराव पाटलांकडून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही

November 8, 2026
भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प
जळगाव जिल्हा

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

November 8, 2026
दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप
जळगाव जिल्हा

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप

November 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add