जळगाव, प्रतिनिधी : शिवसेना (शिंदे गट) आणि ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगावात दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, उपमहापौर मनोज चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, पप्पूशेठ लुंकड, रविंद्र नवाल, निलेश मदानी आणि ॲड. बाहेती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाम कोगटा प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गरजूंना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक राजू मोरे, प्रा. सतीश कोगटा, पवन ठाकूर, किरण राजपूत, रमेश माळी, सम्राट बेलदार, प्रशांत ठाकरे, अर्जुन साळुंखे, कैलास ठाकरे, संजय सपकाळे, योगेश जाधव, विजय चौधरी, रविंद्र परदेशी आदी कार्यकर्ते व मित्रपरिवाराने विशेष सहकार्य केले.








