• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वरणगाव गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 9, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
वरणगाव गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

भुसावळ, प्रतिनिधी : सोशल मीडियावर बनावट (फेक) प्रोफाईल तयार करून एका युवकाला सुनसान जागी बोलावून त्याच्यावर लोखंडी रॉड आणि देशी कट्ट्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मुक्ताईनगर येथील रहिवासी असलेला २४ वर्षीय सरफराज सैयद साकिर सैयद असे मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या कुटुंबाचा मुख्य कमाऊ व्यक्ती होता. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भुसावळ तालुक्यातील दोघा संशयितांना यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत.

१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगरच्या काजीपुरा येथील सरफराज सैयद याला इन्स्टाग्रामवर एका तरुणीच्या नावाने बनवलेल्या बनावट आयडीवरून सतत मेसेज आणि कॉल आले. गप्पा मारण्याच्या बहाण्याने त्याला वरणगाव येथील फुलगांव उड्डाणपुलाखालील (फ्ललाईओव्हर) सर्व्हिस रोडवर बोलावण्यात आले.

सरफराज ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच, तिथे आधीपासूनच दबा धरून बसलेल्या दोन युवकांनी दुचाकीवरून येऊन त्याच्यावर अचानक लोखंडी रॉडने हल्ला केला. हल्लेखोरांनी सरफराजच्या डोक्यावर आणि पायावर लोखंडी रॉडने सपासप वार केले, ज्यामुळे तो खाली कोसळला. हल्ला सुरू असताना एका आरोपीने आपल्या कमरेतून देशी कट्टा काढून सरफराजवर दोन राऊंड गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी सरफराजला तात्काळ जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे काही दिवस मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुण मुलाच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील भूषण उर्फ बिस्ला राजू सावले (वय २०) आणि सिद्धार्थ रामदास ढिवरे (वय २७) या दोघांना अटक केली आहे.


 

ताज्या बातम्या

वरणगाव गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हे

वरणगाव गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

November 9, 2026
दुष्काळी संकटातही बंजारा तांड्यात दिवाळीचा आनंद; मंत्री गुलाबराव पाटलांकडून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही
जळगाव जिल्हा

दुष्काळी संकटातही बंजारा तांड्यात दिवाळीचा आनंद; मंत्री गुलाबराव पाटलांकडून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही

November 8, 2026
भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प
जळगाव जिल्हा

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

November 8, 2026
दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप
जळगाव जिल्हा

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप

November 7, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
आरोग्य

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add