जळगाव, दि.१९ – सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित “मातोश्री प्रतिष्ठान” तर्फे आयोजित “गौराई उपचार केंद्र लोकार्पण सोहळा” रविवारी संपन्न झाला.
हा कार्यक्रम कांताबाई बहुउद्देशीय सभागृहात घेण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्याचे काम आचार्य दादांपासून केले गेले असून, ते काम भरत अमळकर अगदी सक्रियपणे पुढे नेत आहेत. आगामी काळात युवक आपल्या आई- वडिलांना वृद्धाश्रमात पाठविणार नाही, हा संदेश दिला गेला पाहिजे, अशी अपेक्षा मान्यवरांनी मातोशी आनंदाश्रम येथे व्यक्त केली.
या प्रसंगी मंत्री ना. गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, दलीचंद जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, मातोश्री आनंदाश्रमाच्या प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया, आदींसह मान्यवर उपस्थित होते.