• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

समाजासाठी दात्वृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर.. – ना. गुलाबराव पाटील

गौराई बहुउद्देशिय संस्थेचे उद्घाटन, गौराई हाॕलचे लोकार्पण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 16, 2023
in सामाजिक
0
समाजासाठी दात्वृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर.. – ना. गुलाबराव पाटील

जळगाव, दि.१६ – समाजातील उपेक्षित घटकांचे आपण कायमच देणं लागतो याच उदात्त भावनेने जैन उद्योग समूह सदैव कार्य करत आहे. पार्वतीनगरमधील रहिवाशांसाठी गौराई बहुद्देशीय संस्था व हाॕलचे नूतनीकरण करून अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. घटस्थापनेच्या दिवशी गौराई सेवा घट असून दात्वृत्वाने सेवा करणारा जैन उद्योग समूह असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शहरातील पार्वतीनगर येथील गौराई बहुउद्देशीय संस्था उद्घाटन व नुतनीकरण सोहळ्यास उद्घाटक म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या कोनशीलेचे अनावरण व गौराई हाॕलचे उद्घाटन त्यांच्यासह ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, राजा मयूर, आ. सुरेश भोळे, माजी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ज्योती जैन, जैन इरिगेशनचे सिस्टीमचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डाॕ. अनिल ढाके, भाजप उपाध्यक्ष रोहित निकम, बांधकाम व्यवसायिक अनिश शहा, अमर जैन पृथ्वीराज सोनवणे यासह जैन परिवारातील सर्व सदस्य व पार्वतीनगर वाशियांची उपस्थिती होती.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘श्रध्देय भवरलाल जैन तथा मोठ्याभाऊंनी माळी दादांच्या विनंती वरून उभा केलेला गौराई हाॕल ची पुनर्रचना केली असून आज पुन्हा सुसज्ज सेवेसह उपलब्ध करून दिला. गौराई बहुउद्देशीय संस्था मंदिर परिसरात शंकर-पार्वती, दत्तगुरू, गणेशाची मूर्ती व भगवान शंकराची पिंड, नंदी याठिकाणी विराजमान होणार आहेत. तसेच या आवारात बहुउद्देशीय हॉल, खुली व्यायाम शाळा, वाचनालय, किलबिल, बेंचेस अशा अन्य सुविधांसह लोकार्पण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी जबाबदारीने त्याची देखभाल करावी असे आवाहनही त्यांनी केले.

पार्वतीनगर वासियांच्यावतीने अशोक जैन यांचा हृदय सत्कार..
गौराई हाॕलसह नुतनीकरण व मंदिर निर्माणासह अन्य सुविधा उपलब्ध केल्याबद्दल पार्वतीनगर वाशियायांच्या वतिने रामजन्मभुमी मंदिराची प्रतिकृती देऊन अशोक जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी गौराई बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य, परीसरातील नागरिक उपस्थित होते. मंदिर निर्माण करण्यात भरीव योगदान दिल्याबद्दल मान्यवर नागरिकांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौराई बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष राजीव देशमुख, खजिनदार मोहन बेंडाळे, सदस्य भगवान भंगाळे, शामकांत पाटील, सचिन येवले, संजय दर्यापूरकर, मनोज चौधरी, राजेंद्र सदावर्ते, जयश्री वायकोळे, विद्या चौधरी, निमंत्रित सदस्य डिगंबर पाटील, पी. बी. पाटील, प्रा. एस. एन. भारंबे, गणेश सुरळकर यांच्यासह पार्वतीनगर रहिवासी व जैन इरिगेशनचे सहकारी यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव अनिल जोशी यांनी केले. सुत्रसंचालन जयदीप पाटील यांनी केले. आभार डाॕ. अनिल ढाके यांनी मानले.

Next Post
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदाच्या भरतीत दुजाभाव !

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदाच्या भरतीत दुजाभाव !

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज
खान्देश

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज

December 16, 2025
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group