• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फायर स्टेशनला समस्यांचा विळखा; उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून अचानक पाहणीत पोलखोल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 4, 2026
in जळगाव जिल्हा
0
फायर स्टेशनला समस्यांचा विळखा; उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून अचानक पाहणीत पोलखोल

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आपत्कालीन सेवा किती ‘सावध’ आहेत, याचा प्रत्यय शुक्रवारी सकाळी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी केलेल्या अचानक पाहणीतून समोर आला. आयुक्त बंगल्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या फायर स्टेशनची दुरवस्था पाहून उपमहापौरांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. “आयुक्तांचा बंगला केवळ १० मीटरवर असतानाही त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का?” असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

​उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी शुक्रवारी सकाळी आयुक्त बंगल्यालगत असलेल्या फायर स्टेशनला अचानक भेट दिली. यावेळी त्यांना तिथे अनेक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाले. अग्निशमन दलासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागाचा लँडलाईन फोन गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी संपर्क कसा साधायचा, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना लेखी कळवले आहे का, याचीही उपमहापौरांनी कसून चौकशी केली.

​केवळ संवाद यंत्रणाच नाही, तर तांत्रिक यंत्रणाही कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले. अग्निशमन दलाच्या गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी वापरला जाणारा पंप अनेक दिवसांपासून बंद आहे. आग लागल्यास तातडीने पाणी भरण्यासाठी कसरत करावी लागत असल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. ​फायर स्टेशनच्या परिसरात सगळीकडे घाण साचलेली असून नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी साफसफाई होत नसल्याची तक्रार उपमहापौरांकडे केली.

​या पाहणीनंतर उपमहापौर चौधरी यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. ते म्हणाले की, ​”एकीकडे प्रशासन शिस्तीच्या गप्पा मारते, मात्र आयुक्तांच्या निवासस्थानापासून अवघ्या दहा मीटरवर असलेल्या फायर स्टेशनची अशी दुरवस्था होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. लँडलाईन बंद असणे आणि पंप नादुरुस्त असणे हे नागरिकांच्या जिवाशी खेळण्यासारखेच आहे.”
​
​उपमहापौरांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आणि संबंधित विभाग प्रमुखांना या सर्व त्रुटी त्वरित दूर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. जर येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.
​


 

Tags: #jalgaon_city#municipalcorporation
Next Post
३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, आता नव्या रूपात; जळगावात ‘ऐनक प्लस’ या अत्याधुनिक दालनाचे लोकार्पण!

३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, आता नव्या रूपात; जळगावात 'ऐनक प्लस' या अत्याधुनिक दालनाचे लोकार्पण!

ताज्या बातम्या

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

July 9, 2026
जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ
सामाजिक

जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव जिल्हा

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

July 8, 2026
१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार
आरोग्य

१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार

July 7, 2026
निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक
जळगाव जिल्हा

निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक

July 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group