• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेती, पाणी यातुनच महानोर दादांशी ऋणानुबंध – अशोक जैन

‘हा कंठ दाटूनी आला’ व्दारे ना. धों. महानोर यांच्या जयंतीनिमित्त स्वरांजली

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 16, 2023
in जळगाव जिल्हा
0
शेती, पाणी यातुनच महानोर दादांशी ऋणानुबंध – अशोक जैन

जळगाव, दि.१५ – कविवर्य ना. धों. महानोर यांच्याशी जेव्हाही बोलणं व्हायचे तेव्हा शेती, माती, पाणी आणि साहित्य यावरच चर्चा व्हायच्या यातुनच दादांशी ऋणानुबंध वाढत गेले. सुलोचनाच्या पाऊल खुणा हे काकुंच्या आठवणीतील पुस्तक मला अर्पण केल्याची आठवण ‘हा कंठ दाटुनी आला’ या कार्यक्रमागची भुमिका जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितली. यावेळी आई कांताई यांच्यासाठी महानोर यांनी लिहलेली ‘गुंतलेला जीव मायेचा’ ही कविता व ‘आम्ही या खेड्यात जन्मलो दुःखाची गाथा’ हे गीत म्हटले.

कविवर्य ना. धों. महानोर यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाची सुरूवात कविवर्य ना.धों. महानोर लिखीत शब्दांचा खेळ या गीताने झाली. याप्रसंगी मान्यवरांनी पुष्पार्पण केले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, बाळासाहेब महानोर व कुटुंबातील सदस्य, रवींद्रभैय्या पाटील, डाॕ.सदानंद देशमुख, डॉ. सिसिलिया कार्व्हलो, श्रीकांत देशमुख, अशोक कोतवाल, अनिश शहा, नारायण बाविस्कर, डॉ. सुधीर भोंगळे, अमोल शेठ, विलास पाटील उपस्थित होते.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व परिवर्तन तर्फे आयोजित ‘हा कंठ दाटुनी आला’ कार्यक्रमात ‘या नभाला या भुईला दान द्यावे’,’लेकी गेल्या दुर देशी जशा चिमण्या आकाशी’ यासह महानोरांच्या कविता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संदीप मेहता, श्रीकांत देशमुख, सदानंद देशमुख, सिसिलिया कार्व्हलो, डाॕ. रेखा महाजन, हर्षल पाटील, शशिकांत महानोर, पूर्णिमा हूंडीवाले, सोनाली पाटील, जयश्री पाटील, सुनीला भोलाणे, नेहा पवार कविता वाचन केले.

तर सुदिप्ता सरकार, श्रद्धा कुळकर्णी, मंजुषा भिडे, रजनी पवार, चंद्रकांत इंगळे, ऐश्वर्या परदेशी, अक्षय गजभिये यांनी ‘आज उदास उदास पांगल्या सावल्या’, ‘शब्दांचा हा खेळ मांडला’, ‘गो-या देहावरती कांती’, ‘पिक करपलं पक्षी दूर देशी गेलं’, ‘मी गातांना गीत तुला’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘मी रात टाकली’, ‘जगजेठी भरली तिची ओठी’, ‘भरलं आभाळ, घन ओथंबुन येती’, ‘नभ उतरू आलं’ या गीतांसह राजसा जवळ जरा बसा ही लावणी सादर केली. त्यांना साथ संगत भूषण गुरव, योगेश पाटील, रोहित बोरसे यांनी दिली.

निवेदन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना नारायण बाविस्कर यांची होती. सुत्रधार हर्षल पाटील, विनोद पाटील होते.

Next Post
शिंपी समाज हितवर्धक संस्था व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शिंपी समाज हितवर्धक संस्था व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक रुग्णालयात ‘स्नेहन व स्वेदन’ उपचार सुविधा सुरू!
आरोग्य

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक रुग्णालयात ‘स्नेहन व स्वेदन’ उपचार सुविधा सुरू!

June 18, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगच्या मृणाली आणि गणेशराजची ‘कॉग्निझंट’ व ‘अ‍ॅक्सेंचर’ कंपनीत निवड!
शैक्षणिक

गोदावरी इंजिनिअरिंगच्या मृणाली आणि गणेशराजची ‘कॉग्निझंट’ व ‘अ‍ॅक्सेंचर’ कंपनीत निवड!

June 18, 2026
जळगावात उद्यापासून भव्य ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळा
जळगाव जिल्हा

जळगावात उद्यापासून भव्य ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळा

June 18, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
राजकीय

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026
प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी
जळगाव जिल्हा

प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी

June 18, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
जळगाव जिल्हा

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group