जळगाव, दि.१७ – श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था जळगाव व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र शाखेच्या वतीने समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये सध्या परिस्थिती चालू असलेल्या घडामोडी मध्ये ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये व आमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू नये या प्रमुख मागणीचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी सादर केले.
यावेळी समाज अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, राज्य संघटक मनोज भांडारकर, सचिव अनिल खैरनार, कोषाध्यक्ष चेतन, सहसचिव दीपक जगताप, खैरनार युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी, प्रमोद शिंपी, शैलेंद्र मांडगे, अमित जगताप, किरण सोनवणे, उमेश शिंपी, सुनील बाविस्कर, सुमित अहिराव, दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते.