जळगाव, दि.२१ – भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे चांद्रयान-३ चंद्रावर २३ ऑगस्ट ला उतरणार आहे. या ऐतिहासिक अवकाशीय घटनेचे औचित्य साधून अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूल तर्फे २१ व २२ ऑगस्ट दरम्यान अनुभूती चांद्रयान महोत्सवाचे आयोजन केले आहे. अवकाश तंत्रज्ञान तसेच इस्रो संदर्भात व्याख्यानांचे आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्पेस मॉडेल चे प्रदर्शनसुद्धा यावेळी भरवले जाणार आहे.
चांद्रयान महोत्सवानिमित्त खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांचे ‘अपोलो-११ ते चांद्रयान-३’ याविषयावर मानवाच्या चंद्रसफरींचा इतिहास सांगणारे व्याख्यान २१ ऑगस्ट ला सकाळी १०.३० वाजेला अनुभूती इंग्लीश मिडीअम प्रायमरी स्कूल येथे आयोजित केले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या दिवशी २२ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजेला अमळनेर येथील वक्ते विजयसिंह पवार यांचे ‘अवकाशावर बोलू काही’ याविषयावर व्याख्यान अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल सेकंडरी येथे आयोजीत केले आहे. याप्रसंगी कुतूहल फाउंडेशनचे महेश गोरडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. असे अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी कळविले आहे.