जळगाव, दि.०४ – ग्रिन सिटी जळगाव फाउंडेशन तर्फे शुक्रवारी निसर्गकवी ना. धो. महानोर यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान त्यांची आठवण म्हणून गाडगे बाबा चौक ते सावखेडा रस्ता येथे ६ ते ७ फुट उंचीच्या रोपांची लागवड स्वर्गीय ना. धो. महानोर यांच्या नावाने करण्यात आली.
दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीला सर्व सदस्य एकत्र येऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाईल. व त्यांच्या नावाने शहरात देखील वृक्ष लागवड करण्यात येईल असे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय वाणी डॉक्टर सोनार, डॉ. जयंत जागीरदार, डॉ. बेंद्रे, एल. के. सूद, रफिक पिंजारी, संतोष क्षीरसागर, आशिष हाडा, देविदास ढेकळे, भरत झवर, किशोर जाधव, गिरीश अत्तरदे, राजेंद्र पाटील, बापू पाटील, एतेश्याम काझी, कैलास विसावे, जयेश विसावे, जितेंद्र बागडे, विनोद चौधरी, अशोक बागडदे, रवि चौधरी, सुमित्रा पाटील, मनीषा पाटील, दिलीप सपकाळे, बी. एल. वाणी, अश्विनी पाठक, धवल पाटील, जितेंद्र पाटील, दीपक धांडे आदी उपस्थित होते.