जळगाव, दि. १९ – शहरातील रामदास कॉलनी परिसरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे ‘ग्रीन जळगांव सिटी’ तर्फे रविवारी शहरातील आजी-माजी आमदार लोकप्रतिनिधी आदींचे मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी ‘ग्रीन जळगांव सिटी’ तर्फे पर्यावरणाचा समतोल राखत जळगाव शहराचे वाढते तापमान कमी करण्याच्या उद्देशाने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १०० वृक्ष लागवड करण्यात आले. दरम्यान मान्यवरांनी वृक्ष संवर्धन व संगोपन संदर्भात उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन, मनीष जैन, भालचंद्र पाटील, नगरसेवक नितीन लढ्ढा, उज्वला बेंडाळे, गायत्री राणे, सुचिता हाडा, बंटी जोशी, नितीन बरडे, पालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड, ॲड केतन ढाके, भरत अमळकर, विजय वाणी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.