जळगाव, दि. १९ – जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या पुढाकारातुन काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजीनगर मधील खुबचंद सागरमल शाळेमधील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
तसेच सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यां सोबत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, बाबा देशमुख, सुरेंद्र कोल्हे, नईम खान, गोकुळ चव्हाण, जाकीर शेख, प्रवीण पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भारत देशातील जनतेसोबत संवाद साधून एकता, समता व बंधुतेचा संदेश दिला. त्यामुळे नक्कीच पुढील वर्षीचा वाढदिवस हा पंतप्रधान राहुल गांधी म्हणून साजरा करण्यात येईल, अशी भावना जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी व्यक्त केली.