जळगाव, दि.११ – शहरातील आदर्शनगर परीसरात आमदार सुरेश भोळे यांनी भेट दिली. याठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली जातेयं.
दरम्यान आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांनी आदर्शनगर परीसरात जावून तेथील स्थानिक नागरिकांशी चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या. रस्त्यांची कामे होत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक सदाशिव ढेकळे, आशुतोष पाटील, तुषार घुगे, उमेश सोनवणे व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.