• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

असाध्य आजारांपासून बचावासाठी वनस्पती आधारित आहार महत्वाचे : डॉ. झिशान अली

शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये जनऔषधवैद्यकशास्त्र विभागातर्फे विशेष व्याख्यान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 18, 2023
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
असाध्य आजारांपासून बचावासाठी वनस्पती आधारित आहार महत्वाचे : डॉ. झिशान अली

जळगाव, दि.१८ – जीवनशैली निगडित मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार या सारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी फायबर आणि सूक्ष्म पोषक घटकांचा आहारात समावेश करायला हवा. त्यासाठी संपूर्ण अन्न, वनस्पती आधारित आहारचे सेवन करावे. या यात फळभाज्या, डाळी, कडधान्ये, तृणधान्य यांचा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच प्रकिया केलेले पदार्थ जसे की, साखर, बेकरी पॅकेज्ड फूड, मांस याचे सेवन कमी करावे, असे प्रतिपादन अमेरिकेतील वॉशिंग्टन येथून वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. झिशान अली यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जनऔषधवैद्यक शास्त्र विभागातर्फे आयोजित ‘वैद्यकीय क्षेत्रात पोषक आहाराचे महत्व’ या विषयावर डॉ.अली यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी मंचावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता डॉ. प्रवीण शेकोकार, विभाग प्रमुख डॉ. योगिता बावस्कर उपस्थित होते. प्रथम डॉ. मारोती पोटे यांनी, विविध विषयांवर मार्गदर्शक व्याख्याने डॉक्टरांसाठी मार्गदर्शक ठरतील, असे सांगितले.

यानंतर डॉ. झिशान अली यांनी सांगितले कि, रुग्णांना कोणत्या अन्नातून पोषक आहार व फळातून पोषक घटक मिळतील, ते सांगितले पाहिजे. न्याहारी, दुपारचे व रात्रीचे जेवण कसे असावे, संतुलित आहार कसा ठेवावा याची माहिती रुग्णाला मिळाली तर तो निरोगी राहील, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी जंक फूड टाळून कोणता पोषक आहार घ्यावा, हंगामी फळे, सलाद खाण्यावर भर दिला पाहिजे. याबाबतही डॉ. अली यांनी सांगितले. प्रसंगी त्यांनी अमेरिकेत करण्यात आलेल्या विविध संशोधनाचे विश्लेषण केले. डॉ. विनू वीज म्हणाल्या की, सकस आहार घ्यावा. प्रक्रिया केले पदार्थ कमी खावेत. शारीरिक हालचाली असणारे व्यायाम करावे. ८ तास शांत झोप घ्यावी. ताण-तणाव निर्मूलनासाठी प्रयत्न करावे. कौटूंबिक व सामाजिक संबंध उत्तम ठेवावे. यासह व्यसनांपासून लांब राहावे असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे निवेदन डॉ. योगिता बावस्कर यांनी केले. विशेष व्याख्यानाचा ३५ प्राध्यापक डॉक्टरांनी तसेच, तिन्ही वर्षाच्या १५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. जनऔषधवैद्यकशास्त्र विभागातील डॉ. विलास मालकर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. सुनयना कुमठेकर, डॉ. चिराग रामनानी, डॉ. दीपक वाणी यांच्यासह बापू पाटील, राकेश पिंपरकर, अनिता पोलभूणे यांनी परिश्रम घेतले.

 

Next Post
शेंदूर्णीच्या आर्यन वानखेडेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

शेंदूर्णीच्या आर्यन वानखेडेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त
जळगाव जिल्हा

श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त

March 26, 2023
औरंगाबाद विभागात रीतू मंडोरेसह सात विद्यार्थी सीएस परीक्षा उत्तीर्ण
जळगाव जिल्हा

औरंगाबाद विभागात रीतू मंडोरेसह सात विद्यार्थी सीएस परीक्षा उत्तीर्ण

March 25, 2023
आपत्ती व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांनी वाचवले रुग्णाचे प्राण
आरोग्य

आपत्ती व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांनी वाचवले रुग्णाचे प्राण

March 25, 2023
गांधी रिसर्च फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम
जळगाव जिल्हा

गांधी रिसर्च फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम

March 25, 2023
कॅडन्स क्रिकेट क्लब संघाने पहिल्या डावाच्या आधारावर सामना जिंकला
क्रिडा

कॅडन्स क्रिकेट क्लब संघाने पहिल्या डावाच्या आधारावर सामना जिंकला

March 21, 2023
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात “वृक्ष संवर्धनाची गुढी” उपक्रम
जळगाव जिल्हा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात “वृक्ष संवर्धनाची गुढी” उपक्रम

March 21, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.