जळगाव, दि.१८ – तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तथा रत्नागिरी स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ३२ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मुले व मुली राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे डेरवन स्पोर्टस् काॅम्पलेक्स, सावर्डे तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे दि. १६ ते १८ मार्च २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चा संघ सहभागी झाला होता.
यात मुलांच्या २१ किलो वजन गटात आर्यन शांताराम वानखेडे याने सुवर्ण पदक पटकावले. त्याला त्याचे प्रशिक्षक श्रीकृष्ण देवतवाल, जयेश कासार, जयेश बाविस्कर, निकेतन खोडके यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. सुवर्ण पदक विजेता आर्यन वानखेडेची २५ ते २७ रोजी ३६ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे.
त्याच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अजित घारगे, सुरेश खैरनार, रवींद्र धर्माधिकारी, सौरभ चौबे, ललित पाटील, महेश घारगे तसेच जैन स्पोर्टस् अॅकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतूक केले आहे.